मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आपल्या आमदारकीच्या पदाचा राजीनामा देऊ : आमदार सुहास आण्णा कांदे

गर्जा महाराष्ट्र24न्यूजवृतसेवा
नांदगाव ता.३० मनोज जरंगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर जोवर तोडगा निघत नाही तोवर माझ्या मतदार संघातील कुठल्याही गावात आपण जाणार नाही तसेच कुठल्याही प्रकारचे विकासासंबंधीचे भूमिपूजन उदघाटन असो ती आपण करणार नाही.असा निर्धार व्यक्त करीत आमदार सुहासआण्णा कांदे यांनी सोमवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला आपला पाठींबा जाहीर केला.
मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक बोलविली असून त्यात मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल अशी आपल्याला आशा असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला न्याय मिळण्यासाठी प्रसंगी आपण आपल्या आमदारकीच्या पदाचा राजीनामा देऊ अशी घोषणा त्यांनी केली येथील गुप्ता लॉन्सवर तालुक्यासह मतदार संघातील वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यात महाराष्ट्रातील ख्यातनाम निरुपणकार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावी अशी राज्यभरातील वारकऱ्यांची मागणी असून वारकऱ्यांची दखल घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीचा बोनस म्हणून जाहीर केल्यास यंदाच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली ते सूत्र पकडून आमदार सुहास कांदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.