आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ ? सर्वसामान्यांनाही होतात नियम लागू

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
मुंबई ता:18 राज्यात विधानसभा निवडणुकीची तारखा जाहीर झाल्याच्या दिवसापासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे . देशात निवडणूक आयोगाने बनवलेल्या नियमांचे म्हणजेच आचारसंहितेचे पालन करणे ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. यात नियम मोडणाऱ्यांना शिक्षेचीही तरतूद आहे.आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते,ती अनेक प्रकारची असू शकते. त्यामुळे नियम मोडू नयेत किंवा नियम मोडणाऱ्यांची माहिती योग्य विभागापर्यंत पोहोचवता येईल, यासाठी आचारसंहितेचे नियम काय आहेत, याची माहिती असायली हवी.

![]()
आदर्श आचारसंहितेत या गोष्टींना बंदी
1. सार्वजनिक उद्घाटन, पायाभरणी समारंभ 2.नवीन कामे स्वीकारणे 3. शासनाच्या कामगिरीचे होर्डिंग्ज लावता येणार नाही 4. संबंधित मतदारसंघात कोणताही शासकीय दौरा होणार नाही. 5. सरकारी वाहनांमध्ये सायरन लावले जाणार नाहीत. 6. शासनाचे यश दर्शविणारे होर्डिंग काढले जातील. 7. सरकारी इमारतींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास बंदी असेल. 8. सरकारच्या उपलब्धी असलेल्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यमांमध्ये जाहिरात करता येणार नाही. 9. कोणत्याही प्रकारची लाच किंवा प्रलोभन टाळा. देऊ नका, घेऊ नका. 10. सोशल मीडियावर पोस्ट करताना विशेष काळजी घ्या. तुरुंगात जायला तुमची एक पोस्ट पुरेशी आहे. त्यामुळे कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी किंवा लिहिण्यापूर्वी आचारसंहितेचे नियम काळजीपूर्वक वाचा..

सर्वसामान्यांनाही नियम लागू…
सामान्य माणसालाही नियम लागू सामान्य माणसानेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचारसंहितेनुसार कडक कारवाई केली जाईल. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कोणत्याही नेत्याच्या प्रचारात गुंतला असलात, तरी तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जर एखाद्या राजकारण्याने तुम्हाला या नियमांच्या बाहेर काम करण्यास सांगितले, तर तुम्ही त्याला आचारसंहितेबद्दल सांगून तसे करण्यास नकार देऊ शकता. कारण असे करताना आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला ताब्यात घेतले जाऊ शकते.
![]()



