खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग,मुलांनी शरीराला आणि मनाला उत्साह देण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजे :- पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी
लिटर स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये क्रीडा मोहत्सवास प्रारंभ.

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
.
नांदगांव ता.२६ खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे,त्यामुळे मुलांनी शरीराला आणि मनाला उत्साह देण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजे, असे आवाहन क्रीडा महोत्सवाचे प्रारंभ प्रसंगी उद्घाटक नांदगांव चे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केले
नांदगाव येथील लिटल स्टार इंग्रजी स्कुल व रेनबो इंटरनॅशनल. इंग्लिश मिडीयम मध्ये क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात सोमवारी ता २४ रोजी झाली.नांदगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी,नमन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्षा सरिता बागुल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी मांडवड येथील जनता विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब आहेर.सार्थक बागूल,स्कूलचे पालक संघाचे सदस्या श्रीमती.सानप श्रीमती जगधने आदी प्रमुख उपस्थित होते.
वार्षिक क्रीडा महोत्सव प्रारंभी सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मशालीचे प्रज्वलन करून झाली. प्रमुख पाहुणे नांदगांव चे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून प्रोत्साहन दिले.
. कार्यक्रमाची सुरुवात मशाल रणाने करण्यात आली यात सहावीतील विद्यार्थिनीचा सहभाग लाभला . यानंतर सर्व विद्यार्थीचे मार्चपास्ट झाले.रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा डबेल्स डान्स व पहिलीच्या विद्यार्थ्यांचा रेसलिंग सादर केले.लिटिल स्टार इंग्लिश स्कूलचे पाचवीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम डान्स,सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा रिदमिक योगा.सातवीच्या विद्यार्थ्यांचा एरोवीक सदाबहार नृत्य सादर केले.
. क्रीडा शिक्षिका मयुरी खैरनार,शिक्षक.मोहन सुरसे,राहुल उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले,पुढील तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.तर या क्रीडा महोत्सवात सर्व मैदानी खेळ आणि इनडोअर गेम यांच्या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी अतिशय मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा नगे यांनी केले