आपला जिल्हामहाराष्ट्र

रामनवमी उत्सव गुणा गोविंदाने साजरा करा :-पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.०५ रामनवमी उत्सव साजरा करावा उत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन होता कामा नये,कोणीही कायदा हातात घेऊ नये, सोशल मिडीयावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस,फोटो,पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे,कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा,शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे.नियमांचे पालन करावे,असे आव्हान नांदगाव चे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केले.

रामनवमी च्या अनुषंगाने नांदगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवारी ०५ रोजी पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती सदस्य,नांदगाव पालिकेकडील अधिकारी,हिंदू – मुस्लीम बांधव यांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती.यावेळी प्रितम चौधरी पुढे म्हणाले की उत्सव साजरा करताना आयोजकांनी स्वयंसेवकांना ओळखपत्र द्यावे सोशल मीडियावर आमचे लक्ष आहे,मिरवणुकीत दुसऱ्याच्या च्या भावना दुखावल्या जनार नाही अशी वकृत्व,घोषणा अथवा कृती करू नये याबाबत सर्वांनी काळजी घ्या,पोलीस अधीक्षक १६३ अन्वेषण नोटीस दिली आहे त्यात काय करू नये असे निर्देश दिले आहे त्यांचे तंतोतंत पालन करावे.


सदर बैठकीची प्रस्तावना पोलिस निरीक्षक प्रतिम चौधरी यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या / सुचना मांडल्या.त्यानंतर सदर सुचनेचे नगपालिकेचे अधिकारी यांनी सदर समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.सदर बैठकीस पोलीस निरिक्षक प्रितम चौधरी,उपनिरीक्षक संतोष बहाकर नगरपालिकेचे आधिकरी अरूण निकम,दत्तराज छाजेड,सुनील जाधव,अड सचिन साळवे गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार,दत्ता सोनवणे,दिपक मुंडे व पत्रकार व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळ
नांदगाव – येथील पोलिस स्टेशन मध्ये शांतता कमिटीच्या बेठकित मार्गदर्शन करतांना पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बाहकर नगरपालिकेचे आधिकारी अरूण निकम आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.