सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त नांदगांवला स्पर्धा

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव : ता.०७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती नांदगाव नगरपालिका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत विविध स्पर्धांचे नांदगाव शहरांत झाल्या. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२९ व्या जयंतीनिमित्त सारनाथ बौद्ध विहार येथे अशोक जयंती साजरी करण्यात आली.
जयंतीच्या औचित्याने महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला नाना जाधव, अविनाश केदारे, विश्वास आहिरे, मिलिंद खेडकर, राजाभाऊ गांगुर्डे,राजाभाऊ लाठे यांनी पुष्पहार अर्पण केला. समितीच्या सदस्य अलकाताई रूपवते यांनी सम्राट अशोक बद्दल माहिती दिली.ज्येष्ठ नेते अरुण साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन निकम,अँड सचिन साळवे,उत्सव समितीच्या कार्याध्यक्ष अँड विद्या कसबे,बिजला गंगावणे, निर्मलाताई केदारे, सुनीता देहाडे, छायाताई जाधव, वंदना पांडे विजया चतुर, जयाताई जगताप,उषा राठोड, हेमा राठोड,आशाताई पाटील माया आहिरे,करिष्मा कसबे,शबाना मंसूरी, नयना खटके, मनीषा जगताप, तबसुन शेख, अंजली काळे आदी महिला उपस्थित होत्या.