नांदगांवी भगवान महावीर जन्म कल्याणक उत्साहात साजरा.

गर्जा महाराष्ट्र२४ न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता.१२ नांदगांव येथे भगवान महावीर जन्म कल्याणक गुरुवार ता.११ रोजी उत्साहात साजरा करण्यात येऊन यावेळी जैन समाज बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी ६ वाजता सकल जैन समाजाच्या वतीने श्री पाश॔नाथ दिगंबर जैन मंदिर पासुन प्रभात फेरी काढण्यात येउन जैन धर्मशाळेत जैन विश्व ध्वजवंदन दत्तराज छाजेड,सुमेर कासलीवाल,महावीर पांडे आदींच्या हस्ते करण्यात आले यानंतर मंदिरात भगवान महावीर यांचा पंचामृत अभिषेक करण्यात येउन भव्य जुलुस काढण्यात आला होता
भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात जवळपास ४० जैन समाज बांधवांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला तसेच महिलानीं व लहान मुला मुलीनी भगवान महावीरांनवर नाटिका,नृत्य,भजन आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले अशी माहिती जैन समाजाचे अध्यक्ष श्री सुमेर कासलीवाल व महामंत्री महावीर ताराचंद पांडे यांनी यावेळी दिली
हा कार्यक्रम यशस्वीते साठी नुतन कासलीवाल, राजेश बडजाते, सह ट्रस्ट मंडळ,खं.दि.जैन पंचायत कार्यकारिणी सदस्य,नवयुवक मंडळ, महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली,
फोटो
१ ) नांदगांव : भगवान महावीर जन्म कल्याण उत्सवानिमित्त रक्तदान करताना संतोष बरदाते शैलेंद्र कासलीवाल तर दुसऱ्या छायाचित्रात भगवान महावीर जन्म कल्याण उत्सवानिमित्त जैन विश्व ध्वज वंदन करताना दप्तराच्या समीर कासलीवाल महावीर पांडे आदी
( छाया महेंद्र पगार )