नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावर पिंपरखेड शिवारात टोल नाक्याजवळ ट्रकच्या धडक्याने नांदगाव चा नवतरुण ठार

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१२- चाळीसगाव रस्त्यावर पिंपरखेड शिवारात टोल नाक्याजवळ शुक्रवार (ता. ११ ) रोजी रात्री दहा वाजता गणेश बळीराम देवरे वय ३० राहणार होलारवाडा,नांदगाव यास आयशर ट्रकने धडक दिल्याने ठार झाला.आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,शुक्रवारी ता.११ रोजी रात्री दहा वाजता गणेश बळीराम देवरे राहणार होलार वाडा नांदगाव हा चाळीसगाव येथून आपल्या बहिणीस घेऊन येत होता पिंपरखेड शिवारात टोल नाक्याजवळ तो लघुशंकेसाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला असता आयशर ट्रक च्या नंबर एम एच १९ सी. एक्स १४२६ या गाडीने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.
गणेश देवरे हा युवक घरातील कर्ता होतकरु होता,तो नांदगांव शहरात थंड पाणी विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता.त्याच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच तो राहत असलेल्या होलारवाडा,परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.त्याच्यावर शोकाकुल वातावरणात नांदगाव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर अपघाताची नांदगाव पोलिस ठाण्यात मयत गणेश देवरे याची बहीण चेतना योगेश ठाकूर रा.चाळीसगाव यांनी मयत गणेश च्या मृत्यस जबाबदार आयशर ट्रक च्या वाहन चालकास विरोधात फिर्याद दिली आहे मयत गणेश च्या मृत्यूस जबाबदार आयशर ट्रक चालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर हवालदार गोसावी करत आहे.