हनुमाननगर मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता.१४ तालुक्यात शनिवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पवनपुत्र हनुमान की जय,बजरंग बली की जय.असा जयघोष मध्ये करण्यात आला.
हनुमान जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच फुलाहारांची सजावट करण्यात आली होती पहाटेपासूनच हनुमान जयंतीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला.पहाटे काकड आरती, भजन,कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कल्पेश निकम सौ जागृती निकम यांनी मारुतीला रुद्राभिषेक, पूजा, महाआरती करण्यात आली.यावेळी श्री कल्पेश निकम या दांपत्याने नवसपूर्ती करत बजरंगबलीस चांदीचा मुकूट अर्पण केला
महिलांनी पाळणा गीत म्हटले.त्यानंतर महाआरती करण्यात आली .शनिवारीच हनुमान जयंती असल्यामुळे भक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.
फोटो ओळ
नांदगाव :-हनुमाननगर येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्ताने अभिषेक करतांना कल्पेश निकम सौ जागृती निकम व पुरोहित विकास शर्मा….शेजारी उपस्थित भाविक…