महाराष्ट्र

बाणगाव ला श्रीरामनवमी व हनुमान जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहा संपन्न..

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगांव ता.१४ येथील श्री बाणेश्वर मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने श्री रामनवमी तव हनुमान जयंती उत्सवानिमित्त गाथा पारायण,श्रीरामजप व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

रविवारी ता.६ रोजी जेष्ट नेते बापुसाहेब कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विनापुजनाने या सोहळ्याची सुरूवात झाली सोहळ्यादरम्यान रविवार ता. ०६ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वा.
कलश पुजन,सप्तहा काळात नियमितपणे दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन,दोन सप्तहात गाथा पारायण, सायंकाळी, ५ ते ६ हरिपाठ शनिवारी १२ रोजी रात्री हनुमान जयंती निमित्त हभप प्रभू महाराज आहेर यांचे कीर्तन झाले व रविवारी १३ एप्रिल रोजी सकाळी हभप रामकृष्ण महाराज निकम यांचे काल्याचे किर्तन झाले यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांच्या हस्ते दहिहंडी फोडली या वेळी उपस्थितांना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येउन या सोहळ्याची सांगता झाली यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते


फोटो ओळ

बाणगाव बुद्रुक येथे बाणेश्वर मंदिरात श्रीरामनवमी व हनुमान जयंती उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहा सन्माप्ती दिनी काल्याच्या कीर्तनात दहीहंडी फोडताना जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.