ताज्या घडामोडी

बाणगाव ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगांव ता.१४ : तालुक्यातील बाणगाव येथील समाज मंदिर, जनता विद्यालय,मराठी शाळा,ग्रामपंचायत आदी ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष चांगदेव देवकर होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा’हा मूलमंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक जे व्ही पवार यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेबांचं अभ्यास प्रेम आणि वाचन प्रेम समजावून सांगितले आणि या दोन गोष्टींमुळे आपल्या देशाला एक महामानव आणि भारतरत्न मिळालं हे पटवून सांगितलं.

तसेच जिल्हा परिषद शाळेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामण साबळे यांनी प्रतिमापूजन केले यावेळी स्थानिक शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत माजी पदाधिकारी ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक संजय शेवाळे, उपशिक्षक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राथमिक शाळेत शिक्षकांनी भारतीय संविधानाचा उल्लेख करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नीटपणे समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचणे अत्यावश्यक आहे असे सांगितले. याचबरोबर मुख्याध्यापक संजय शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी योग्य वेळी शिक्षणाचे महत्त्व ओळखून उपलब्ध संधीचा स्वतःच्या विकासासाठी फायदा करून घ्यावा आणि डॉ बाबासाहेबांसारखं महान कार्य करावं असं आवाहन केलं.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांना समजलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात मांडण्याचा प्रयत्न केला.

समाज मंदिरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने .भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले,गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी माजी सरपंच संगीता बागुल,होत्या यावेळी शिक्षक रवींद्र कवडे, चिंतामण साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन रवींद्र कवडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी माजी सरपंच संगिता बागुल,माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम काका कवडे,प्रभाकर कवडे,नारायण कवडे,रविंद्र कवडे, चांगदेव देवकर,विकास कवडे,न्यानदेव कवडे,पोलीस पाटील सागर बागुल ,देवचंद बागुल,रघुनाथ बागुल, बापू बागुल चिंतामण साबळे,रावसाहेब बागुल अंगणवाडी सेविका सुशीला कवडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावात काढण्यात आली.घरांसमोर रांगोळ्या काढून गल्ल्या सुशोभित करण्यात आल्या होत्या.सुहाशिनिंनी ठिकठिकाणी रथाचे औक्षण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.संयुक्त जयंती महोत्सवामुळे गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.