शताब्दी वर्षात लाल बावट्याचे निशाण प्रत्येक गावात उभे करा
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात निर्धार

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव, ता. ११: तळागाळातील कष्टकऱ्यांना गावपातळीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम केवळ लाल बावटा करीत असल्याने आता हे काम प्रत्येक गावात अधिक जोमाने उभे करण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात करण्यात आला.
येथील जैन धर्मशाळेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक जिल्हा अधिवेशन दोन सत्रात झाले. व्यासपीठावर राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव डॉ. राम बाहेती, सहसचिव राजू देसले, जिल्हा सचिव महादेव खुडे, भास्करराव शिंदे, दामूअण्णा पाटील, साधना गायकवाड, दत्तू तुपे, व्ही. डी धनवटे, सुनीता कुलकर्णी, तल्हा शेख, सुकदेव केदारे, प्राजक्ता कापडणे, जैनु शेख, आदी उपस्थित होते. अधिवेशनाला प्रारंभहोण्यापूर्वी शेकडो कष्टकरी कामगारांचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली. विचार मंचाला दिवंगत नेते शंकर गंभीरे यांचे नाव देण्यात आले .प्रवेशद्वाराला दिवंगत नेत्या, स्वातंत्र्य सैनिक कुसुम ताई माधवराव गायकवाड यांचे नाव देण्यात आले
पक्षाचे राज्य सचिव अॅड सुभाष लांडे यांनी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष गेल्या शंभर वर्षापासून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर असून शेतकरी, कामगार, जनतेला संघटित
करून न्याय हक्कासाठी लढत आहे. नांदगाव तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते दिवंगत माधवराव गायकवाड यांचा वारसा पुढे नेण्यासाठी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न शताब्दी वर्षात करू या. तसेच भारतीय संविधान वाचवण्यासाठी या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
: निवडणुकांचे रणशिंग
सकाळच्या पहिल्या उद्घाटन सत्रात नाशिक जिल्हात पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच शेतकरी कामगार प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद निवडणूक, मनपा निवडणूक बाबत कार्यकर्त्यांना दिशादर्शन करण्यात आले. पक्षाच्या त्यागाची, संघर्षाची व बलिदानाची शंभर वर्षे कसे गेलीत यावर उपस्थित वक्त्यांनी कार्यकत्यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक जिल्हा सचिव महादेव खुडे यांनी केले. सूत्र संचलन संयोजक देविदास भोपळे यांनी केले. आभार दत्तू तुपे यांनी मानले
नाशिकला अधिवेशन
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे सध्या शताब्दी वर्ष सुरू असून, २५ डिसेंबरला नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे ठरले. त्यानिमित्ताने कामगार शेतकरी शेतमजूर क्षेत्रात काम करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभणार असल्याने नांदगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन पक्षाचे राज्य सहसचिव राजू देसले यांनी या वेळी केले
अधिवेशनात विविध ठराव मंजूर…
जनसुरक्षा कायदा लागू होऊ देणार नाही. जिल्ह्यात शताब्दी वर्षानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करणे. स्मार्ट कायद्यांचा निषेध, सर्व असंघटित कामगार,कर्मचाऱ्यांना नवीन कामगार
योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळायला पाहिजे
मीटर विरोधात व्यापक जनचळवळ उभी करणे.
आगामी तीन वर्षांसाठी जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली. यात कॉ. महादेव खुडे,कॉ.दत्तू तुपे,कॉ.तल्हा शेख,कॉ.भास्कर शिंदे,कॉ. देवीदास भोपळे,कॉ.किरण डावखर,कॉ.पद्माकर इंगळे,कॉ.अॅड साधना गायकवाड,कॉ.सुनीता कुलकर्णी,कॉ.प्राजक्ता कापडणे,
डॉ.आर.भोंग,कॉ. व्ही.डी.धनवटे,कॉ.नामदेव बोराडे,कॉ.रामचंद्र ठिळे, अॅड.समीर शिंदे,सुकदेव केदारे,रंगनाथ जिरे,भीमा पाटील,योगेश जाधव,मीना आढाव,महाद् पवार,अनिल पठारे,नितीन शिरालकर, मनोहर पगारे,जैनू शेख,मक्सुद अन्सारी,विराज देवांग,प्रकाश भावसार आदी एकतीस प्रतिनिधींची निवड करण्यात आली