लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चा दहावीचा निकाल १०० टक्के

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता.१४ नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व दहावीचा निकाल १००% लागला
स्कूलची यावर्षीची प्रथम दहावीची बॅच होती प्रथम क्रमांक कु.भावेश हिरे ८४ % द्वितीय कु.प्रेम पगारे ७६.८०% तुतीय,कु. वेदांत इंगोले ७४.६०% विशेष प्राविण्य तृतीय कु शॉन गोयकर ७१.८० % , कु साहिल बागुल ७०.२०% कु.लीजा अन्सारी ६६.८०% उत्तीर्ण विद्यार्थी आले.या यशवंत विद्यार्थ्यांसाठी स्कूलचे अध्यक्ष संजय बागूल,उपाध्यक्षा सरिता बागूल,शिक्षक संदीप पांडे,राहुल उपाध्ये,मोहन सुरसे,शिक्षिका श्रीमती अनिता जगधने,श्रीमती मेघा शिरसाट व स्कूलचे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
या वर्षी स्कुल मधील दहावी च्या वर्गाची प्रथमच वर्ष असल्याने असल्याने स्कुल व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांची लेखी तीन वेळा सराव परीक्षा घेऊन योग्य नियोजन व व्यवस्थापन केले.तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परिश्रम घेतले.असे गुणवंत विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले