आपला बुद्यांक तपासून विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निवडावे :- जेष्ट नेते बापुसाहेब कवडे
बानगावला दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता.२२ गुण मिळविणे हे कष्टचे काम आहे यात कायम सातत्य राहावे लागते दहावी – बारावी निकालात मुलीच प्रथम आहे,मुलांनी ध्येयवादी होत प्रशासकीय अधिकारी होण्याची धडपडत आपल्या अंगी बाळगावी,यात यश नाही आले तरी आपल्यात नैराश्य आपल्यात येऊ देऊ नका,पालकांनी आपल्या मुलांची बुद्यांक किती आहे हे तपासून घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनीही आपला बुद्यांक स्वतः तपासून पुढील क्षेत्र निवडावे प्रतिकूल परिस्थितीतील लोकच सात्याने विचार करत पुढे जातात,भविष्यात तुम्हाला कुठलेली शैक्षणिक,आर्थिक अडचण आली तर तुम्हाच्या मदतीला मी तत्पर असेल असे आवाहन ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी केले.
बाणगाव येथील लोकनेते,माजी खासदार,स्वर्गीय आण्णासाहेब कवडे सभागृहात बाणगाव ग्रामस्थांच्या तर्फे झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानी बोलत होते.
यावेळी जनता विद्यालयातचे मुख्यध्यापक जे.बी पवार,विद्यालयाचे स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष चांगदेव देवकर,सदस्य प्रभाकर कवडे,आण्णासाहेब कवडे,रुपचंद बोरसे,पत्रकार बाबासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरस्वती देवीच्या फोटोचे पूजन करत पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करत
बाणगाव येथील मविप्र संस्थेच्या जनता विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.यशाची ही परंपरा कायम राखली आहे.दहावीच्या परीक्षेत येवला तालुक्यात प्रथम आलेली कु.यशश्री कावेरी नितीन वाकचौरे (98.)टक्के गुण मिळविले आहे व बाणगाव जनता विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु.गायत्री अनिल देवकर (९०.६०) द्वितीय कु साक्षी राजेंद्र फणसे (९०.२०),कु.समृद्धी महेंद्र गोराडे (८९.६०)तृतीय तर विशेष प्राविण्य कु.स्वाती सुरेश शिंदे(८८.२०) कु ऋतूजा शिशुपाल सदगीर (८७) टक्के मिळवत उत्तीर्ण होत पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या यशवी होत बाजी मारली आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी पालकांसह गौरव करण्यात
जेष्ट नेते बापुसाहेब कवडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, फुलगुछ,शालेय वस्तू देवून गौरविण्यात आले यावेळी मुख्याध्यापक जे.बी पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या,यावेळी
पत्रकार बाबासाहेब कदम म्हणले की ग्रामीण भागातील विद्यार्थीनाही गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत आहे,जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विद्याथ्यनी पारंपारीक अभ्यासक्रमाऐवजी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवत आपल्या गावचे नाव लौकीक मिळावे यावेळी सत्कारर्थी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमातचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर कवडे यांनी तर सुत्रसंचालन शिक्षक आर.ए.चोळके यांनी तर आभार शिक्षक रविंद्र कवडे यांनी मानले यावेळी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी पवार,शिक्षक श्री.आर.ए कवडे,श्री.पी.डी सिसोदे,श्रीमती एस.आर.बोरसे, श्री.आर.ए.चोळके,श्रीमती व्ही.ए.शिंदे,श्रीमती व्ही.ए.काळे
शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीम.एस.ए.बोरसे,श्रीमती.सी.एच चव्हाण सेवक,श्री.जी.बी.आहेर,श्री.जी.पी.कवडे, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो ओळ
बाण गाव बुद्रुक – येथील लोकनेते माजी खासदार स्वर्गीय आण्णासाहेब कवडे सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी जेष्ट नेते बापूसाहेब,कवडे,पालक व ग्रामस्थ आदी