नांदगाव ला होरायझन अकॅडमीत विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१० येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमीत, सोमवारी ता.०९ रोजी नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे – पाटील होते. या प्रवेश सोहळा प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आनंदात होते.शालेय शिक्षिका सोनाली पायल,दक्षता, स्वप्ना आदींनी नृत्य सादर केले.प्राचार्या श्रीमती पुनम मढे व शालेय शिक्षिका शरयू आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषण तालुका संचालक अमित बोरसे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती पुनम डी मढे,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रामनाथ गायकवाड,डॉ.गणेश चव्हाण,सुसेन आहेर,रमेश बोरसे,संजय कदम प्राचार्य कैलास जाधव, दत्तात्रय भिलोरे,आदी उपस्थित होते.