आई वडील हेच आपले पहिले गुरु असा संदेश देत लिटल स्टार इंग्लिश स्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा
नांदगाव ता.०११ आई – वडील हेच आपले पहिले गुरु आहे आपल्या प्रथम गुरूचे आपल्या जीवनातील स्थान आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यालाच अनुसरून आपल्या जीवनातील पहिला गुरु म्हणजेच आई व वडिलांचे पाद्यपूजन करून एक अनोखा उपक्रम लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राबवण्यात आला.

नमन शैक्षणिक संकुलातील लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कुल च्या तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्षा सरिता बागुल, तसेच शाळेच्या प्राचार्या वासंती नटराजन यांच्यासह शाळेचे शिक्षक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्री- प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई – वडिलांचे पाय धुवून त्यांची पूजा केली व त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल यांनी गुरु पौर्णिमेची माहिती दिली. ते म्हणाले की गुरूंच्या कृपेमुळे जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी येते असं मानलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे जीवनात यश आणि प्रगती होते. आपल्या जीवनातील सर्वात प्रथम गुरू हे आपले आई-वडील आहे


विद्यार्थ्यांना गुरु व शिष्य कसे असावेत यांची माहिती दिली.याप्रसंगी आपल्या आयुष्यामध्ये आपला पहिले गुरु आपले आई वडील असते हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या माता पालकांना गुरुस्थान देऊन त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरु वंदना करत वेग वेगळे नृत्य देखील साजरे केले. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग कार्ड,मिठाई, वेगवेगळे भेटवस्तू देऊन आपल्या गुरूंप्रती आदर दाखविला



तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांकडून गौरविण्यात आले.हा उपक्रम यशस्वीरित्या प्रार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

फोटो ओळ
नांदगाव – येथील नमन शैक्षणिक संकुलातील लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये गुरूपौर्णिमा दिनी शिक्षकांना गुरु वंदना करत नृत्य सादर करताना विद्यार्थी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्षा सरिता बागुल, तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती वासंती नटराजन आदी





