छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या समृद्ध दुर्गसंपदेच्या इतिहासाला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण :- आमदार सुहास आण्णा कांदे

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नाशिक ता.०
११ महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गड-किल्ल्यांचे महत्त्व अभेद्य आहे. स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोककल्याणासाठी गडकोटांचा आधार घेऊन निर्मिलेले ‘स्वराज्य’ हा गाभा पकडून, सांस्कृतिक वारसा या श्रेणीत मोडणारे,स्वराज्याचे रक्षण करणारे १२ किल्ले जागतिक वारसा नामांकनामध्ये समाविष्ट व्हावेत,यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत असणाऱ्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने प्रस्ताव तयार केला होता.

यामध्ये,महाराष्ट्रातील ११ किल्ले – रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,शिवनेरी,लोहगड, साल्हेर, सिंधुदूर्ग, सुवर्णदूर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला यांचा समावेश करण्यात आला होता.तर दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवरायांनी जिंकलेला,महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेला तामिळनाडूतील जिंजी हा एक किल्ला देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. या सर्व १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’ ने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.

*जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा,हे सर्व घडून यावे, यासाठी महायुती सरकारने अत्यंत काटेकोर नियोजन करुन, अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करुन अथक प्रयत्न केले.एकूणच दुर्गसंपदेला जागतिक वारसा म्हणून नामांकन लाभणे हे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त जनता केंद्र व राज्य सरकार यांच्या परिश्रमाचे व सदभावनाचे फलित आहे असेहि आमदार.सुहास आण्णा कांदे यांनी सागितले




