आमदार सुहास अण्णा कांदे यांचा वाढदिवस महायुतीतर्फे उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री सुहास अण्णा कांदे यांचा वाढदिवस भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या महायुतीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने नांदगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये मिठाई वाटप करण्यात आले. तसेच,नांदगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्थेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांचे अभिनंदन करण्यात आले.पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मिठाई व केक वाटप करून वाढदिवसाचा आनंद सर्वांनी साजरा केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड यांनी केले. यावेळी RPI जिल्हा कार्याध्यक्ष देविदास अण्णा मोरे,भाजपा तालुका अध्यक्ष संजय सानप,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी आमदार श्री कांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन RPI तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार यांनी केले.यावेळी RPI उत्तर महाराष्ट्र संघटक भास्करराव निकम, भाजपा शहराध्यक्ष रेखाताई शेलार,सतीश शिंदे,RPI जिल्हा संघटक रवी गरुड,संस्थेचे माजी संचालक पुंजाराम भाबड,ओबीसी सेल अध्यक्ष दिलीप निकम,सुनील काकळीज,वाल्मीक सादवे,प्रकाश काकळीज,अरुण बागुल,अशोक काकळीज,अशोक बोराळे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.