नांदगाव ला लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनलमध्ये शिक्षक दिन साजरा

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक /नांदगाव ता. 08 – नमन एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष,सरिता बागुल मुख्याध्यापिका श्रीमती वासंती नटराजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी गायन,नृत्य,भाषण आणि विनोदी नाटिका सादर करत शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले.विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळा प्रशासनाची भूमिका साकारून एक दिवस शाळा चालवण्याचा अनुभव घेतला.
या प्रसंगी संस्था अध्यक्ष संजय बागुल यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विषद करत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर आणि जागरुकता निर्माण केली.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू,ग्रीटिंग कार्ड्स, पुष्पगुच्छ देऊन एक अनोखा सरप्राईज देत आपले प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप संस्थापक अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष सरिता बागुल यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करून करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून यावर्षी “आदर्श शिक्षक पुरस्कार 2025-26” चे आयोजन करण्यात आले होते.पालक व विद्यार्थ्यांच्या मतदानाच्या आधारे रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस व लिटिल स्टार स्कूलच्या नेहा पाटील यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुंदर व सुयोग्य सूत्रसंचालन श्रीमती वर्षा नगे यांनी केले.हा अविस्मरणीय दिवस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यातील बंध अधिक दृढ करणारा ठरला.
फोटो /
नांदगाव/ येथे लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय बागूल,उपाध्यक्ष सरिता बागूल मुख्याध्यापिका वासंती नटराजन,व शिक्षिका