साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अतुल बोरसे (पाटील) यांची बिनविरोध निवड

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव (ता. 10 सप्टेंबर) – तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज अतुल बोरसे (पाटील) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच किरण बोरसे यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या एक महिन्यांपासून हे पद रिक्त होते.
आज ग्रामपंचायत कार्यालयात मंडळ अधिकारी यू.के.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. सरपंचपदासाठी एकमेव अर्ज अतुल बोरसे (पाटील) यांचाच आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यू.के. गायकवाड व ए.व्ही.गावित यांनी जाहीर केले.
अतुल बोरसे (पाटील) हे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अमित बोरसे (पाटील) यांचे ज्येष्ठ बंधू असून,सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे भक्कम अस्तित्व आहे.निवडीनंतर ग्रामपंचायत परिसरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, मविप्र संचालक अमित बोरसे,ग्रामसेवक गणेश अमुक, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश बोरसे, रमेश (अण्णा) बोरसे, भारत बोरसे, संजय अहिरे,तात्या बोरसे,कांतिलाल बोरसे, शिवा बोरसे,रवींद्र बोरसे, शरद सोनवणे, प्रीतम पाटील, मधुकर सूर्यवंशी, उपसरपंच सोनाली अहिरे, तसेच सदस्य ताराबाई सोनवणे, घनश्याम सुरसे, मोनाली सूर्यवंशी, भालचंद्र बोरसे, वनिता बोरसे, प्रशांत बोरसे, मनिषा बोरसे, राजेंद्र भामरे, वंदना दुरडे, वाल्ह्याबाई कदम, दीपाली मोरे, यशोदा डोळे, नरहरी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिक्रिया….
“ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो.साकोरा ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.विकासकामांमध्ये पारदर्शकता राखत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
ग्रामीण भागात पाणीपुरवठा,रस्ते, स्वच्छता,आरोग्य, शिक्षण आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती यावर विशेष भर देणार आहे.सर्व सदस्यांना बरोबर घेऊन साकोरा गावाला आदर्श गाव बनवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.”
अतुल बोरसे (पाटील) -नवनिर्वाचित सरपंच साकोरा