“एक दिवस – एक साथ – एक तास” उपक्रमांतर्गत नांदगावमध्ये स्वच्छतेचा संदेश

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. २५ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “स्वच्छता ही सेवा – २०२५” अभियानाच्या निमित्ताने नांदगाव नगरपरिषद मार्फत “एक दिवस – एक साथ – एक तास” स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील शनी मंदिर उद्यान,लक्ष्मीनगर उद्यान व गुरुकृपा नगर उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.स्वच्छतेसाठी स्वयंप्रेरित श्रमदान करत नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली.

“स्वच्छता ही सेवा २०२५” उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज विविध स्वच्छता संबंधित उपक्रम राबविण्यात येणार असून, याअंतर्गत उद्या दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात पीएम स्वनिधी, आयुष्मान भारत योजना व सुर्यघर योजनेसंदर्भात माहिती व लाभासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात बँक प्रतिनिधी व महावितरणचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
—
💬 कोट:
> “स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी नसून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांचा उस्फूर्त सहभाग म्हणजेच या उपक्रमाचे यश आहे.”
— शामकांत जाधव,मुख्याधिकारी,नांदगाव नगरपरिषद

📸 फोटो ओळी (Caption):
नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेसाठी श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग.





