तात्काळ पीक पंचनाम्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे शासनाला निवेदन

गर्जा महाराष्ट्र 24 nyuj वृत्तसेवा
नांदगाव ता. 25 नांदगाव व मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर तत्काळ पंचनामे करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे निवेदन दिले.
गेल्या दोन दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव, न्यायडोंगरी महसूल मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक अतिवृष्टी झाली. या पावसामुळे मका, सोयाबीन, कपाशी, बाजरी,कांदे यांसारखी काढणीला आलेली पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून,उत्पादनाची संपूर्ण शक्यता संपुष्टात आली आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनीची वरची सुपीक मातीही वाहून गेली असून, जमिनी नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार श्री कांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन तत्काळ पंचनामे करण्याचे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे निवेदन दिले. यानंतर कृषीमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले असून, aआजपासून (२५ सप्टेंबर) महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे.
—
💬 कोट:
> “शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन शासनाने तात्काळ मदतीचे पाऊल उचलणे गरजेचे आहे.पंचनामे लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.”
— आमदार सुहास अण्णा कांदे




