छत्रपती नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्षपदी कॉ. राजू देसले यांची एकमताने निवड!
शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या समाजभिमुख कार्यकर्त्यांवर विश्वासाचा ठसा

गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा
मनमाड :ता. 01 छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध समाजवादी विचारवंत व शेतकरी कामगार चळवळीचे नेते कॉ.प्रकाश नरहर देसले (राजू देसले) यांची एकमताने निवड करण्यात आली.
मनमाड येथील मुख्य कार्यालयात आज (१ नोव्हेंबर) सहाय्यक निबंधक संस्था,नांदगाव कार्यालयाचे अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. उगलमुगले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा अॅड. साधनाताई गायकवाड,तसेच अॅड. दत्ता निकम,डॉ.चंद्रकांत पाटील,डॉ.दिलीप खर्डे, डॉ. कुरेशी अब्दुल गनी, श्री.भागवत पाटील,सौ.निलाक्षी स्वर्गे,श्री.गंभीरे साहेबराव, दत्ता ढिकले,धर्मेंद्र जाधव,आणि महाव्यवस्थापक शाम गरूड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.उपस्थित सर्व संचालकांनी एकमताने राजू देसले यांच्या नावाला अनुमोदन दिले.
१९९३ साली ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या प्रेरणेने या पतसंस्थेची स्थापना झाली.संस्थेच्या नाशिक,ओझर,वडाळीभोई,नांदगाव,पेठ आणि मनमाड या शाखा कार्यरत असून,८ हजारांहून अधिक सभासद या संस्थेशी जोडलेले आहेत.सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत.
कॉ. राजू देसले १९९३ पासून संस्थेशी जोडलेले असून, २००० पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत.सध्या ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव,आयटकचे राज्य सचिव (महाराष्ट्र),किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष,तसेच कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिकचे विश्वस्त आहेत.
@@@@
नवनिर्वाचित उपाध्यक्ष कॉ. राजू देसले यांची प्रतिक्रिया :
“ही निवड ही माझ्या वैयक्तिक सन्मानाची नसून, शेतकरी, कामगार आणि समाजातील सामान्य माणसाच्या विचारांचा विजय आहे. छत्रपती पतसंस्थेला पारदर्शक, लोकाभिमुख आणि सेवा-दृष्टिकोनातून अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे श्री देसले यांनी निवडीनंतर सांगितले.
संस्थेच्या सभासदांसह समाजातील सर्व स्तरातून कॉ.राजू देसले यांच्या निवडीचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.



