आपला जिल्हामहाराष्ट्र

एकोणीस वर्षीय तरुणाच्या आत्महत्येमुळे नांदगावात खळबळ

गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा

│ नांदगाव (ता. २): नांदगाव शहरातील एका एकोणीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.या घटनेमुळे शहरात हळहळ आणि खळबळ उडाली आहे.

मयत तरुणाचे नाव राहुल अशोक भोसले (वय २९,रा.अहिल्यादेवी नगर, नांदगाव) असे असून,त्यांनी राहत्या घरातील लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मयताच्या चुलत भावाने — योगेश मधुकर भोसले यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक डिंगबर भदाणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित,यांनी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर व पोलीस हवालदार मोरे करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू (A.D.) म्हणून केली आहे.

दरम्यान, स्थानिक समाज माध्यमांवर अशी चर्चा रंगली आहे की,राहुल यांनी कर्ज फेडण्याच्या चिंतेला आणि व्याजदारांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग निवडला.
मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की,या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, राहुल यांनी काही खासगी व्यक्तीकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतले होते.मुदलापेक्षा अधिक रक्कम परत केल्यानंतरही वसुलीसाठी त्यांच्यावर सतत दबाव आणला जात असल्याने ते तणावात होते,अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

या घटनेने नांदगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून,तरुणाईवर वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना चिंताजनक ठरली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.