नांदगावच्या शिवकन्यांची राज्यस्तराकडे झेप!
क्रीडा क्षेत्रात मुलींची भरारी; कबड्डी आणि किक बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरीय निवड

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. 03 –नांदगाव तालुक्यातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धांकडे दमदार झेप घेतली आहे. येत्या ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या ३६व्या महिला कबड्डी किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत नाशिक ग्रामीण संघाच्या ताफ्यात शिवकन्या संस्थेच्या सात कबड्डीपटूंनी स्थान मिळवले आहे.
या यशस्वी खेळाडूंमध्ये राणी गुजर,वैजयंती गांगुडे,अक्षदा गांगुडे, ऋतुजा आहेर,श्वेता गांगुडे,ऋतिका आहेर,हुमेरा पठाण
या कबड्डीपटूंचा समावेश असून,त्यांनी विभागीय स्तरावर दमदार खेळ करत राज्यस्तरीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे.
याशिवाय ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी धुळे येथील विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत व्ही.जे. हायस्कूलची विद्यार्थिनी कु.हुमेरा पठाण (६३ किलोग्रॅम गट) हिने उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
या सर्व खेळाडूंच्या यशामागे मुख्याध्यापक श्रीमती देवरे,कबड्डी कोच विशाल आहेर,एनएसएफ क्लबच्या मेघा,पृथ्वी,रोहन बागुल (मनमाड), विद्याताई कसबे,हेमराज चव्हाण (ढेकू) आणि संदीप आहेर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे.
या सातही मुलींचे यश नांदगाव तालुक्यातील मुलींना क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणादायी ठरत असून,पालक व शिक्षकवर्गातून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



