आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश! मनमाड बाजार समितीतील १६२५ शेतकऱ्यांना २.६९ कोटींचे कांदा अनुदान मंजूर
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; शासनाच्या निर्णयाने समाधानाचा श्वास

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
मनमाड : ता. 04 आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील तब्बल १६२५ शेतकरी बांधवांचे कांदा अनुदान मंजूर झाले आहे.शासनाकडून एकूण रु. २,६९,८२,१५५ इतकी अनुदान रक्कम मंजूर झाली असून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने २०२२-२३ दरम्यान कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिले होते. आमदार कांदे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर केले.
३ ऑक्टोबर रोजी सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,नाशिक) कार्यालयाकडून या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२०२२-२३ मध्ये कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा आणि मानसिक आधार मिळाला आहे.
प्रतिक्रिया….
“शेतकरी बांधवांच्या हक्काचा प्रश्न असल्यामुळे मी स्वतः हा विषय शासनाकडे गांभीर्याने मांडला. १६२५ शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.शेतकऱ्यांचे श्रम वाया जाऊ नयेत म्हणून हे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यात जमा होईल,अशी खात्री आम्ही घेत आहोत.”
सुहास आण्णा कांदे : आमदर नांदगाव विधानसभा




