आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांना यश !
गिरणा धरण पांजण डावा कालव्यातून दोन आवर्तनांच्या कायमस्वरूपी पाणी आरक्षणाला शासनाची मंजुरी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव (प्रतिनिधी):ता.05 नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर गिरणा धरण पांजण डावा कालव्यातून दोन आवर्तनांच्या कायमस्वरूपी पाणी आरक्षणास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे

या निर्णयामुळे कळवाडी,देवगट,साकूर,नरडाणे,उंबरडे,चिंचगव्हाण आणि दापोरे या सात गावांतील शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली असून,परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
गिरणा धरण या गावांच्या अगदी जवळ असूनही कालव्याला नियमितपणे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे पीक कोमेजत होते आणि नागरिकांना पाण्याचा तीव्र तुटवडा भासत होता.मात्र आता शासनाच्या मंजुरीनुसार 0.7589 द.ल.घ.मी.पाण्याचा हक्क कायमस्वरूपी आरक्षित करण्यात आला आहे.
या निर्णयासाठी आमदार कांदे यांनी जलसंपदा मंत्री दादाजी भुसे आणि गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले.याआधीही त्यांनी दुष्काळ काळात अतिरिक्त पाण्याचे आवर्तन मंजूर करून आणले होते. त्या वेळी झालेल्या जलपूजन सोहळ्यात त्यांनी “या गावांसाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण मिळवून दाखवीन” असा शब्द नागरिकांना दिला होता — आणि आज त्यांनी तो शब्द पाळला आहे.
@@@@@@@@@
गावांमध्ये आनंदाचा उत्सव:
अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने या सातही गावांतील नागरिकांनी आमदार सुहास अण्णा कांदे आणि ज्ञानेश्वर कांदे यांचे आभार मानले असून,परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.या निर्णयामुळे आता या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
—
प्रतिक्रिया:
“मतदारसंघातील या सर्व गावातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे,तोच माझी खरी ताकद आहे.जनहिताचे कल्याणकारी कार्य करणे हे माझे कर्तव्य आहे,आणि हेच कार्य मी सातत्याने करत राहीन. शेतकरी बांधव व सामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर मी सरकार दरबारी पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहीन.”
सुहास अण्णा कांदे,- आमदार नांदगाव विधानसभा

—



