नांदगाव नगरपरिषदेसाठी शिवसेनेच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. 11 : शिवसेना पक्षाकडून नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी ता 10 रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या.देवाज बंगलो येथे आयोजित या मुलाखतींसाठी शंभरहून अधिक इच्छुकांनी उपस्थित राहत प्रचंड प्रतिसाद दिला.
शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.रवींद्र टापरे,तसेच सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखत प्रक्रिया पार पडली.यावेळी कोर कमिटी सदस्यांनीही इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच नांदगाव शहर आणि विधानसभा मतदारसंघात झालेल्या सर्वसमावेशक व भरीव विकासकामांमुळे शिवसेनेच्या माध्यमातून नगरपरिषदेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत मोठ्या संख्येने उमेदवार मुलाखतीस सामोरे गेले.
नांदगाव नगर परिषदेतील २० नगरसेवक पदांसाठी इच्छुकांनी दावेदारी सादर केली. यावेळी शहरातील रस्ते,पाणीपुरवठा,स्ट्रीट लाईट,गटारी, आरोग्य,व क्रीडा सुविधा यासह नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर उमेदवारांची मते आणि भूमिका जाणून घेण्यात आली.
मुलाखतीवेळी कोर कमिटी सदस्य राजेश कवडे,आनंद कासलीवाल, अमोल नावंदर,ज्ञानेश्वर कांदे,प्रमोद भाबड,अरुण पाटील,किरण देवरे, सागर हिरे,सुनील जाधव,तसेच शिवसेना महिला आघाडीच्या विद्या जगताप,संगीता बागुल,रोहिणी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषद निवडणुकीसाठी मिळालेला प्रतिसाद पाहता नांदगावमध्ये शिवसेनेकडून सक्षम आणि विकासाभिमुख उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



