महाराष्ट्रराजकीय

नांदगाव निवडणुकीत आज सात अर्ज दाखल; राष्ट्रवादी आघाडीवर,भाजपकडून एक अर्ज

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव (ता. १५) – नांदगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, भाजपचा एक तसेच दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश :

प्रभाग ९(अ) – बेग निलो मुक्तार (राष्ट्रवादी), बेग निलो मुक्तार (अपक्ष)

प्रभाग ३(अ) – साक्षी विश्वास आहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग १(ब) – सतीश बाळासाहेब शिंदे (भाजपा)

प्रभाग २(ब) – शाहिस्ता माजिद सय्यद (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग २(ब) – उल्हास प्रकाश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

गेल्या दोन दिवसांतील अर्जांसह आजअखेर एकूण दहा उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहे. उद्या (रविवार) आणि सोमवार या दोन दिवसांत विविध पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुकांचे अर्ज वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार उद्या रविवार (१६.११.२०२५) हा सुट्टीचा दिवस असूनही उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच १७.११.२०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारले जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शामकांत जाधव यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी, नांदगाव नगरपरिषद यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.