“नांदगाव पालिका निवडणूक : पडद्याआडच्या चर्चांना यश;
भाजपा–शिवसेना युतीची आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या उपस्थितीत घोषणा”

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव, ता. १५ – नांदगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युतीचा प्रस्ताव अखेर आज अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब करण्यात आला. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नेहमीच भाजप कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्याने यावेळी संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकारी म्हणाले. आमदार सुहास आण्णा कांदे व समृद्धी बँकेच्या अध्यक्षा सौ.अंजूमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली.

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत,केवळ शिवसेना पक्षासोबत लढण्याचा निर्धार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या निर्णयाचे स्वागत करत सौ.अंजूमताई कांदे यांनी स्थानिक नेतृत्वाचे आभार मानले.
शुक्रवारी रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,आमदार डॉ.राहुल आहेर व जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेकडून योग्य जागांचा प्रस्ताव मिळावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या उच्च नेतृत्वाशी चर्चा केली होती.भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड व तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी आमदार सुहास कांदे यांच्यासोबत दीर्घ बैठक घेतली.पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेला आमदार श्री कांदे यांचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच युतीचा मार्ग मोकळा झाला.

शनिवारी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.नांदगावचा सर्वांगीण विकास व आवश्यक नागरी सुविधा पुरविण्याच्या आमदार कांदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे दत्तराज छाजेड व संजय सानप यांनी सांगितले.

या वेळी दीपक देसले,रेखा शेलार,राजीव धामणे,सतीश शिंदे,सचिन पांडे,उमेश उगले,शरद उगले,धनराज मंडलिक,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,साईनाथ गिडगे,किरण देवरे,प्रमोद भाबड,माजी सभापती विलासराव आहेर,सुनील जाधव,सागर हिरे,राजाभाऊ देशमुख,अमोल नावंदर आदी उपस्थित होते.
—
🔍 विशेष : पडद्याआडचा खेळ
गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात लढलेल्या भाजपाच्या भूमिकेबाबत प्रश्नच निर्माण झाले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपसोबत जाण्याच्या हालचालींनाही वेग आला होता. याच काळात समृद्धी बँकेच्या अध्यक्षा सौ.अंजूमताई कांदे यांनी स्थानिक भाजप नेत्यांसोबत संवाद साधत पडद्याआडून या युतीला आकार दिला आणि अखेर भाजप–शिवसेना युती साकार झाली.
—

📸 फोटो ओळ :
नांदगाव : भाजपा–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा करताना आमदार सुहास कांदे, सौ.अंजूमताई कांदे, दत्तराज छाजेड,संजय सानप, राजेश कवडे,राजीव धामणे, रेखा शेलार, सतीश शिंदे आदी.



