कृषी व व्यापार
Trending

नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान

कसमादेत परिसरात अभोंणा येथे अवकाळी पाऊस

गर्जा महाराष्ट्र न्यूज24
नाशिक ता.०५ : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे
येथील कसमादे परिसरात अभोंणा येथे रविवार (ता. ५) रात्री तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. पहाटेपर्यंत वारा व जोरदार पावसाच्या सरींनी शेतात पाणी तुंबले.
अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या कांदे,मिरची,टोमॅटो,गहू व हरभऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या पावसामुळे करपा,भुरी सारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने,शेतकऱ्यांना बुरशी नाशकांची फवारणीचा अतिरिक्त फटका बसला आहे.परिसरातील बहुतांश आंब्याच्या झाडांना आलेला मोहर वारा आणि अवकाळी पावसाने झटकला असून,परिसरातील आंब्याचे प्रमाणही घटणार आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.