नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान
अभोण्यात अवकाळी पावसामुळे; पिकांचे नुकसान

गर्जा महाराष्ट्र24न्यूज
नाशिक ता.०५ हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे रविवारी नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरात संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते कसमादे तील अभोंणा येथे रविवार (ता. ५) रात्री तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली.पहाटेपर्यंत वारा व जोरदार पावसाच्या सरींनी शेतात पाणी तुंबले पहावयास मिळाले रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला कांदे,मिरची,टोमॅटो,गहू व हरभऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अवकाळी पावसामुळे करपा,भुरी सारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने,शेतकऱ्यांना बुरशी नाशकांची फवारणीचा अतिरिक्त फटका बसला आहे. कसमादे परिसरातील बहुतांश आंब्याच्या झाडांना आलेला मोहर वारा आणि अवकाळी पावसाने झटकला असून, परिसरातील आंब्याचे प्रमाणही घटणार आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.