
गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव,ता.२३ राज्यात ऐकीकडे पावसाने अहंकार उडाला असताना नांदगाव तालुक्यात पावसाकडून हुलकावणी मिळत असल्याने हातातला खरिपाचा हंगाम वाया जाऊ नये यासाठी महागडी बियाणे घेत पेरण्या करून बसलेल्या शेतकऱ्यांना झालेला खर्च तरी भरून येतो की नाही याची समस्या उभी राहिली आहे.आतापर्यंतची सर्व नक्षत्रे कोरडी जात असताना अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे आता तरी पेरण्या केलेल्या व उगवणीला आलेल्या पिकाला आधार मिळेल या आशेपोटी नजीकच्या दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पुढे दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे.एप्रिल महिन्यात तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानीचा साधा रुपया देखील बळीराजाच्या पदरात पडलेला नाही.कांदा अनुदानाचे तरी पैसे मिळतील या आशेवर राहणाऱ्या बळीराजाने बाजारात हातउसने करीत यंदाच्या खरीप हंगामाची तयारी करत बाजारातून महागडी खते बी-बियाणे घेत सगळी तयारी केली आणि पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला तरीही नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या बळीराजाला लहरी पावसाने तोंडचे पाणी पळविले आहे.राष्ट्रीयकृत बँकेकडून पीककर्ज मिळाले.नाही म्हणून सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याने याही परिस्थितीत पीकपेरा केला आणि पाऊस गायब झाला अशी काहीशी परिस्थिती आहे तालुक्यातील विविध भागात पडलेला पाऊस एकसारखा नाही.सुरवातीला घाटमाथ्यावर झाला नंतर दक्षिण,पश्चिम पट्ट्यात त्याने हजेरी लावली.त्यामुळे तालुक्याच्या एकूण खरिपाच्या ६० हजार ८१४ हेक्टरपैकी अवघ्या पत्रास हजार हेक्टरात मागे पुढे अशा एकूण ८० ते ८५ टक्के एवढ्याच पेरण्या झाल्या आहेत.यंदा मोठ्या प्रमाणात मक्याकडे शेतकरी वळाले आहे.पेरणी झाली पण उगवलेल्या पिकांना पाणी नाही अशी अवस्था या पिकाची होताना दिसत आहे.पाऊस बेभरवशाचा झाला आणि पेरण्या रखडल्या या अवस्थेतून बाहेर येत पेरण्या करून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पुढे ज्या ठिकाणी पेरण्या झाल्यात त्याठिकाणी जेमतेम असणारी उगवण बघून पाऊस पडला नाही तर पिके काळी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय पावसाने थोडा बहुत आधार दिला तरी येणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे हें निश्चित,नांदगाव तालुक्यात,बाणगाव,मोरझर,टाकळी,खिर्डी,अस्तगाव,खादगाव,घनेर आदींसह पश्चिम दक्षिण भागात तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य उभे राहण्याची भीती सतावत आहे.जून महिन्यातच कोरडा चारा संपल्यामुळे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रतिटन या भावाने सायगाव-पिलखोड भागातला ऊस जनावरांसाठी आणावा लागत आहे.त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा होणारी घट याची वेगळी चिंता लागली प्रश्न देखील निर्णायक वळणावर आला आहे.नांग्या- साक्या,माणिकपुंज धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून त्याठिकाणाच्या उपलब्ध मृत जलसाठ्यातून नऊ गावे व एकवीस वाड्या वस्त्यांना आठ टँकरच्या माध्यामातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहेत.



