ताज्या घडामोडी

नांदगांव – येवला रस्त्यावरील वाढत्या ट्रॅफिक चा पहिला बळी

नांदगांव - येवला रस्त्यावर कलंत्री खळ्याजवळ भीषण अपघातात महिला जागीच ठार,दुचाकी चालक गँभीर जखमी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगांव ता.०१ नांदगांव – येवला रस्त्यावर मल्हारवाडी गावाजवळ जवळील कलंत्री खळ्याजवळ भीषण अपघातात धनेर येथील महिला जागीच ठार तर दुचाकी चालक गँभीर जखमी झाले आहे.

नांदगांव – येवला रस्त्यावरील मल्हारवाडी गावाजवळील कलंत्री खळ्याजवळ शुक्रवारी ता.०१ रोजी सकाळच्या सुमारास मल्हारवाडी, येथील माहेर असलेल्या सुनीता जाधव या बेलदारवाडी येथील आपला भाऊ सोमनाथ चव्हाण याचेकडे माहेरी आलेल्या होत्या.शुक्रवारी सकाळच्या सुमारास बेलदारवाडी येथून नांदगांव च्या दिशेने आपल्या स्कुटी MH 15 FE 3082 ने जात असताना आशानगर येथील कलंत्री खळ्याजवळ रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात दुचाकीने हुलकावणी दिल्याने स्कुटीवरील महिला सुनीता माणिकराव जाधव वय (५०) रा.धनेर ह्या शेजारी जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक R J -14 GN – 9646 या वाहनांच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार भिकन महाळू वाळुंजे वय (६३ ) रा नाशिक हे गँभीर जखमी झाले,अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला या अपघाताची माहिती नांदगांव पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रतिम चौधरी,सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत अपघातात जखमी भिकन वाळुंजे यांना उपचारासाठी नांदगांवच्या सरकारी रुग्णालयात हलविले तर अपघातात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेले,पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली,या अपघातानंतर नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतिम चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडे येवला रोड,छत्रपती संभाजीनगर रोड,मालेगाव या प्रमुख रस्त्यावर जागोजागी असले खड्डे बुजविणे,वळणावर दिशादर्शनासाठी बोर्डे लावणे,पुलावर संरक्षण कथाडे बसविणे शहराच्या महत्वाचे ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक दर्शक आडवे पट्टे मारणे तसेच बायपासजवळ,मालेगाव रस्त्यावरील महाविद्यालयात जवळ व साकोरा रस्त्यावरील उड्डाणपूल जवळ गावांचा नावाचा दिशादर्शनासाठी नेम बोर्ड लावण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे,

******

इंदोर – पुणे राज्यमहामार्गावरील मनमाड शहरातील रेल्वे लाईन वरील उड्डान पुलाचा कठडा तुटल्याने सदर या मार्गावरील वाहतूक मालेगाव – नांदगाव – येवला या मार्गाने वळविल्याने नांदगाव शहरातील जुनी पंचायत समिती ते रेल्वे बायपास मार्गे मल्हारवाडी पर्यत मोठया प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक वाढली असून सदर वाहतुकीचे योग्य वेळेत नियोजन होणे गरजेचे आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.