नांदगाव – येवला रस्त्यावर तांदुळवाडी फाट्याजवळ भीषण अपघातात शिवसेना शाखा प्रमुख आप्पासाहेब भिलोरेंचा मृत्यू

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१८ नांदगाव – येवला रस्त्यावर तांदूळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात.
नांदगाव – येवला रस्त्यावर तांदुळवाडी फाट्याजवळ बुधवारी येवला येथून नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या चाकी वाहन एस.सुपर केरी M H 15 J C 2349 व नांदगाव येथून भौरी च्या दिशेने जाणाऱ्या दु चाकी यांचा भीषण अपघात झाला हा अपघातात इतका भीषण होता की चारकी वाहन रस्त्यावर पलटी झाले दुचाकी चारचाकी वाहनांखाली दाबली गेली या अपघातात भौरी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख आप्पासाहेब खंडू भिलोरे वय ५५ यांचा मृत्यू झाला
अपघात स्थळी स्थानकानी धाव घेत बचाव कार्य केले अपघातात माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव अपघाताची माहिती घेतली रात्री.उशिरापर्यंत पर्यंत अपघातात कारणीभूत चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अपघातात मृत्यू झालेले आप्पासाहेब भिलोरे भौरी गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख होते तसेच ते प्रगतिशील शेतकरी होते त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर गावात एकच शोककळा पसरली आहे