नांदगावला आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी नवंगतांचे जँगी स्वागत..

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१६ येथील मविप्र संचालित आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक शाळेत,पहिल्या दिवशी फुले फुंग्याची देखणी कमान उभारण्यात आली सोबत नवगत विद्यार्थ्यांसाठी चक्क विविधरंगी फुलाचे कार्पेट अंथरण्यात आले होते शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं कुमकुम तिलक लावत मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले असा सगळा तामझाम स्वागतासाठी ठेवण्यात आला होता मविप्रचे संचालक अमित पाटील-बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम गवांदे व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पाटील तसेच मुख्याध्यापक अविनाश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व मविप्रच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव निकम होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थाना शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमास माता पालक संघाच्या अध्यक्षा श्रीमती अक्षदा कुलकर्णी विशेष उपस्थित होत्या. शाळेतील शिक्षकवृंद सर्वश्री संजय जाधव,श्री शिरसाट,राजकुमार महाले ,आशा बागुल,रुपाली शिंदे,निशिगंधा कदम,श्री.कदम,जयश्री बोरसे, मनीषा दरेकर,योगेश्वर रायते आहेर भाऊसाहेब,सोपान सोळुंके श्री सुभाष पवार कृषिकेष श्री शेलार मामा,माधवी देवकर,श्रीमती पवार यांच्या सक्रिय सहभागातून व सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
फोटो ओळी नांदगाव:- येथील मविप्र संचालित आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी मुख्याध्यापक अविनाश साळुंके राजेश पाटील यांच्यासह शिक्षक पालक