नांदगाव येथील लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ढोल ताशांच्या गर्जात चिमुकल्याचे जल्लोषात स्वागत

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१० येथील लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य महामंडळ व सीबीएसई अभ्यासक्रमाच्या स्कूलमध्ये विद्याथ्यर्थ्यांचे ढोल तासाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सोमवारी (ता.९) रोजी सकाळी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राच्या प्रारंभी आलेल्या नवीन व जुन्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांचे प्रवेशद्वार उभारले होते संस्थेचे अध्यक्ष संजय बागूल उपाध्यक्षा.सरिता बागूल स्कूलचे प्रिन्सिपल वासंती नटराजन व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देत टाळ्यांच्या गजरात व ढोल ताशांच्या गर्जात स्वागत केले.यावेळी विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे पूजन केले यावेळी मुलांनी ढोल ताशांच्या वाद्यांवर मनसोक्त केला.कार्यक्रमात चे सूत्रसंचालन शिक्षिका अनिता जगधने यांनी केले
प्रतिक्रिया….
जे विद्यार्थी यंदा पहिली आणि दुसऱ्या इयत्तेत शिकत आहेत,त्यांचे शालेय जीवन सुरू झालेले असले तरी त्यांनी शाळा अद्याप पाहिलेलीच नाही.वर्ग काय असतो,सोबतचे विद्यार्थी,शिक्षक हे वातावरण त्यांच्यासाठी खूप नवे असणार आहे.त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत येत असताना त्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्यदायी वातावरणाला प्राधान्य देणार असून,त्यांच्यासाठी निकोप वातावरण तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत
संजय बागुल – अध्यक्ष लिटल स्टार इंग्लिश स्कुल नांदगांव
******
मला आज स्कुल मध्ये माझे फ्रेंड,टीचर भेटले खूप आनंद झाला आहे,मी दररोज स्कुल मध्ये येणार.
वेदश्री कदम – विद्यार्थी लिटर स्टार इंग्लिश स्कुल नांदगांव
फोटो ओळ
नांदगाव येथील लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ढोल ताशांच्या गर्जात चिमुकल्याचे जल्लोषात स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष संजय बागूल,उपाध्यक्षा.सरिता बागूल स्कूलचे प्रिन्सिपल वासंती नटराजन शिक्षक
.