जन्मोजन्मी लाभो तुझी माझी साथ…
नांदगाव तालुक्यात व परिसरात सुवासिनींकडून वटपौर्णिमा उत्साहात साजरी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१० जन्मोजन्मी पती-पत्नीचे नाते असेच अखंड रहावे,अशी प्रार्थना करत मंगळवारी (ता.१० ) रोजी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला नांदगाव व परिसरातील गावात सुवासिनींनी वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले.यानिमित्त परिसरातील गावातली तसेच नगरा मधील विविध मंदिरे व आपल्या घराच्या परिसरात असलेल्या वडाच्या मोठ्या वटवृक्षाखाली सुवासिनींची पूजेसाठी गर्दी झाली होती.
पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला आहे. आपल्या पातिव्रत्याने सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले,अशी अख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते. आजच्या आधुनिक युगातही हा दिवस तितक्याच पारंपारक पद्धतीने साजरा केला जातो.जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपूजा करणे ही वटपौर्णिमेचा हेतू आहे.
मंगळवारी सकाळी दहा नंतर श्री बानेश्र्वर मंदीर परीसरात,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवातील श्री दत्त मंदिराच्या समोर,चांडक नगर महादेव मंदिर या ठिकाणी पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
नवविवाहित महिला सह जुन्या पिढीतील महिलांनी
सौभाग्याचे लेणं घेऊन मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहोचल्या.वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेर बांधत तिथे उपस्थित असणाऱ्यांना महिलांना वाण दिले.पुरोहितांच्या मंत्रोचरात महिलांनी हिरव्या बांगड्या,हळकुंड,सुपारी, बदाम यासह आंबा वाहून पूजा करण्यात आली.जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने वडाची पूजा करताना ठिकठिकाणी दिसून येत होत्या.वटपौर्णिमनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या.तसेच आपला उत्सवाचा क्षण आपल्याला मोबाइल मध्ये टीपत होत्या तर पूजेचे फोटो,व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाच्या आकाऊंटवर झळकविले दुपारपर्यंत वडाची पूजा आटोपल्यानंतर घराघरांत जाऊन वाण देण्यासाठी सायंकाळपर्यंत महिलांची धावपळ सुरू होती
फोटो ओळ
नांदगवा : वटपौर्णिमेनिमित्त नांदगाव महाविद्यालयाच्या आवारात वटवृक्षाची पूजा करून धाग्याचे सात फेर मारताना सुवासिनी.दुसऱ्या छायाचित्रात खिर्डी येथे हळदी कुंकू करताना सुवासिनी.