नांदगाव ग्रामीण फोटोग्राफी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौ. गायत्री सोनवणे तर उपाध्यक्षपदी चेतन जाधव यांची बिनविरोध निवड

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक ता.१२ नांदगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफी असोसिएशनच्या अध्यक्षपदी महीला फोटोग्राफर सौ गायत्री सोनवणे यांची तर,उपाध्यक्षपदी बाणगाव चे चेतन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मंगळवारी ता १० रोजी कपिलेश्वर महादेव मंदिरात सकाळी १० वाजता नांदगाव ग्रामीण फोटोग्राफी असोसिएशन ग्रुपची मिटींग संपन्न झाली.या मिटींगमध्ये नांदगाव तालुक्यातील ग्रामीण विभागतले फोटोग्राफर उपस्थित होते.
मिटींगमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची निवड करण्यात आली नांदगाव तालुक्यात पहीली महीला फोटोग्राफर सौ-गायत्री सोनवणे यांची अध्यक्षपदी तर,उपाध्यक्षपदी बाणगाव चे चेतन जाधव,खजिनदार किरण चव्हाण (न्यु.पांझण डोरलीपाडा )यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.यावेळी सुहास पुतांबेकर, शैलेश मिस्त्री,भारत केसकर, रोहीत काकळीज,दिपक गायकवाड, गणेश सांगळे,मनोज देतकर,गोरख शेरमाले,लक्ष्मण शिंगाडे,मनोज विसपुते नंदु सोनवणे,सागर खरे,प्रसन्न मंगनर,विशाल सूर्यवंशी, प्रशांत जाधव, साहील नाईक, शुभम आहेर उमेश भड गहुड सार्थक गायकवाड गणेश चौधरी,सचिन चव्हाण,यश आहीरे,निलेश सांळुखे,देविदास कोल्हे,सागर खरे.सौरभ निकम उपस्थित होते. ग्रामीण फोटोग्राफर शरद आहेर यांनी सूत्रसंचलन केले
फोटो ओळ
नांदगाव – नांदगाव ग्रामीण फोटोग्राफी असोसिएशनच्या पदाधिकारी निवडी प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी, सभासद