नांदगांव – चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघातात 3 ठार
मृतांत नवरदेवाच्या सख्ख्या भावाचा समावेश .

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव,ता १७ नांदगांव तालुक्यातील कासारी येथील लग्न सभारंभ आटोपून परतणाऱ्यामारुती एर्टिगाची समोरून येणाऱ्या मालवाहू तीन चाकी वाहनाला (अपे रिक्षाची)धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला हा अपघात पोखरी शिवारातील हायवेवर सानप मार्केट कमेटी परिसरात झाला मृत तिघे जण निफाड तालुक्यातील जळगाव व बोकडदरा येथील असून अन्य आठ जण जखमी आहेत याबाबत ऍपेरिक्षा चालकाने एर्टिगा चा चालकाविरोधात नांदगांव पोलिसात तक्रार दाखल केली आहे मृतांत नवरदेवाच्या सख्ख्या भावाचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी शुक्रवारी कासारी ता नांदगाव येथे बापू सानप यांच्या मुलीचा विवाह निफाड तालुक्यातील जळगाव येथील शरद कराड यांच्या मुलासोबत शुक्रवारी दुपारी मोठ्या थाटात पार पडला त्यानंतर सांयकाळी सर्व विधी पार पडून नवरदेव नवरी वेगळ्या वाहनाने रवाना झाले मात्र वऱ्हाडातील नवरदेवाचा भाऊ निलेश शरद कराड वय २६ व अन्य युवक लग्न सोहळा आटोपून उशिराने एर्टिगा ( क्रमांक MH 02 EE 2309)या वाहनाने कासारी येथून निघाले असता पोखरी शिवारातील हायवेवर सानप मार्केट जवळ नांदगाव येथून अमोल आहिरे हे त्यांच्या मालकीची माल वाहतुक टाटा एक्स क्र. MH 41 AU 5316 हिच्यामध्ये सिमेंटच्या गोण्या घेवुन नांदगाव वाजुकडुन कासारीकडे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा येऊन धडकली व भीषण अपघात झाला त्यात तुषार शरद कराड २५ हा जागेवर तर अन्य सात ते आठ जण जखमी झाले या जखमी मध्ये नवरदेवाचा सख्खा भाऊ निलेश शरद1 कराड वय1 २६ रा जळगाव ता निफाड व अक्षय सोनवणे वय २४ रा बोकडदरा ता निफाड याना अत्यवस्थ स्थितीत वैद्यकीय उपचारासाठी शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले व पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रात्री उशिरा त्यांचे निधन झाले या प्रकरणी पोलिसांनी एर्टिगा कार चा चालक वैभव वाल्मीक वेताळ रा.जळगाव,ता. निफाड,जि.नाशिक याने अविचाराने हयगयीने रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून रींग साईडने येवुन फिर्यादी अमोल याच्या च्या गाडीला जोरात ठोस मारुन अपघात करुन त्यात फिर्यादीचे दुखापतीस व तसेच तुषार कराड,रा.जळगाव,ता.निफाड,जि.नाशिक याच्या मरणास व इतरआठ लोकांच्या गंभीर दुखापतीस तसेच दोन्ही गाड्यांच्या नकसानीस कारणीभूत झाला म्हणन गन्हा दाखल केला आहे.सदर अपघातात अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर,पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे