नांदगांव ला लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विठ्ठल नामाची शाळा भरली…

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता .०६ येथील नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिभावाने, आनंदात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, आणि त्यांच्या मनामध्ये आध्यात्मिक मूल्यांची पेरणी व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
‘
शनिवारी ता. ५ रोजी आषाढी एकादशी दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष .संजय बागूल,उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी दिनाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी
दिंडी सोहळा काढत शिक्षणाची आनंद वारीचे विलोभनीय दर्शन’घडविले.
या वेळी.सार्थक बागूल,प्रिन्सिपल
वासंती नटराजन यांच्या हस्ते श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर पालखीचे पूजन झाले श्री विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी.शिवांश खैरनार,शिवांश चौधरी,विनीत पांडे , सिया खैरनार व मयुरी शिंदे या विद्यार्थ्यांची देखील ईश्वरी स्वरूपात पूजा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकादशीचे महत्त्व शिक्षिका. विजेता परदेशी व इ.६ वी.च्या समृद्धी मोरे,आराध्या गोराडे,श्रावणी राजोळे यांनी सांगितले.रेनबो स्कूलचे इ.४ थी ते ६ वी चे विद्यार्थी आणि लिटिल स्टारचे इ.६ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यानीअप्रतिम नृत्य सादर केले.स्कूल मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वारकरी वेशभूषेत उपस्थित होते.
या अद्वितीय सोहळ्यात दिंडीमध्ये फुगडी,भव्य वारीचे रिंगण,भगवा झेंडा पताका,विणा वादन,टाळ वादन,डीजे वादन,चिमुकले वारकरी व लेझीम पथकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थीनी यानी या अनोख्या वारीचा आनंद एका वारकरी स्वरुप घेतला.
स्कुल व्यवस्थापन च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खास प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता जगधने यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्रिन्सिपल,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
फोटो ओळ
नांदगाव :-येथील नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी वेशभूषेतील विध्यार्थी