नांदगाव तालुक्यात अवकाळीच्या अवकळा
पंचनामे पूर्णत्वासाठी प्रयत्न : तालूका कृषी अधिकारी जगदीश पाटील

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव, ता. २२ गेल्या आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदगाव तालुक्यात वीसहून अधिक गावातील दोन हजार ५०० हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रातील उभ्या पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.पंचनाम्यानंतर नेमके किती क्षेत्र क्षतिग्रस्त झाले याचा अधिकृत आकडा हाती येईल.संप मागे घेण्यात आल्याने येत्या आठवड्यात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली.
सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.बाणगाव लोढरा,श्रीरामनगर,व वंजरवाडी या गावांना गारपीट झाली होती.नांदगाव,मनमाड,लक्ष्मीनगर,मांडवड तळवडे, वेहेलगव,हिसवळ लक्ष्मीनगर,सोयगाव,वडाळी आदी गावांना अवकाळी पाऊस पडला.
या आठवड्यात तालुक्यात पावसाची पाचही महसूल मंडळात
एकूण ३६ मिली एवढ्या पावसाची नोंद झाली.मात्र,सर्वात जास्त नुकसान घाटमाथ्यावरील लोढरे गावात झाले असून या ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे ४५० हेक्टरवरील उभ्या पिकाची हानी झाली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसासोबत चार ते पाच जनावरे व एक इसम वीज कोसळल्याने ठार झाल्याची घटना घडली.विजांच्या गडगडाटासहसायंकाळी अवकाळी पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली.वादळीवारे व विजांच्या गडगडाटासह पावसाने शहर व परिसरासह तालुक्यातील विविध भागात धुमाकूळ घातला.जवळपास विविध भागातून पंचवीस ते तीस हेक्टरातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा विजांचा गडगडाटासह गारांचा पाऊस झाल्याने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ झाली सर्वाधिक हानी कांदा पिकाला बसली असून एकूण दोन हजार ३०० हेक्टर क्षेत्रातील कांदापिकाचे नुकसान झाले आहे
.
रब्बी हंगामाचे मोठे नुकसान
रब्बी हंगामात काढणीला आलेली गहु हरभरा पालेभाज्या फळे आदी पिके आडवी तर आंब्याचा मोहोर गळाला. कैरी पडल्याने नुकसान झाले. अवकाळी पावसाने गहू, कांदा,मका आंबा,लिंबू आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.त्यात साधारणतः गहू ४० हेक्टर, कांदा दोन हजार ३०० हेक्टर, फळपीक दोन हजार हेक्टर,भाजीपाला दोन हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. एका आठवड्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून एक इसम व पाच जनावरे ठार झाली.