ताज्या घडामोडी
लिटल स्टार इंग्लिश स्कुल व रेंबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा
नांदगांव ता.०७ येथील नमन शैक्षणिक संस्थेच्या लिटल स्टार व रेंबो इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये महामानव,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल, लिटल स्टार स्कुल च्या प्रिन्सिपल अनुराधा खांडेकर, रेंबो इंटरनॅशनल स्कुल च्या प्रिन्सिपल सुजता सूर्यवंशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
स्कुलच्या शिक्षिकेनी विद्यार्थ्यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांच्या जीवन संघर्षाची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
नांदगाव : येथील लिटल स्टार इंग्लिश स्कुल व रेंबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर