ताज्या घडामोडी

नांदगांव शहराला गिरणा धरणातून समांतर पाणीपुरवठा योजनेच्या,५३ कोटी रुपये खर्चाचा योजनेचा निघाला कार्यारंभ आदेश

अठरा महिन्यात योजना पूर्ण होणार : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ९ नगरोत्थान मधून गिरणा धरणावरील त्रेपन्न कोटी रुपयाच्या नांदगाव शहर समांतर नळपाणी पुरवठा योजनेला अखेर मुहूर्त लागला आहे या योजनेसाठी आमदार सुहासआण्णा कांदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तांत्रिक,प्रशासकीय मंजुरीच्या सोपस्कारानंतर आता योजनेचा कार्यारंभ आदेश निघाला आहे त्यामुळे ५६ खेडी नळयोजनेच्या अनियमित व विस्कळीतपणा आणि दहा ते बारा दिवसाचा आवर्तनाचा कालावधी यामुळे पाणी पुरवठ्याच्या जाचातून नांदगावकरांची कायमची सुटका झाली आहे.

गिरणा धरण ते नांदगाव पालिकेच्या जलकुंभापर्यंतच्या मुख्य तसेच उपजलवाहिन्यात होणाऱ्या गळत्या व आवर्तनाचा लांबणारा कालावधी यावर शाश्वत पर्याय म्हणून शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरु करण्याचा शब्द आमदार सुहासआण्णा कांदे यांनी दिला होता तो त्यांनी आता खरा ठरविला आहे. गेल्या वर्षी करंजवण योजना व ७८ खेडी योजना निमित्ताने डिसेंबर महिन्यात मनमाड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव शहराला गिरणा धरणातून समांतर पाणी पुरवठा योजनेची मागणी मंजूर करून घेतली होती.
त्रेपन्न कोटी रुपयांच्या या योजनेचा कार्यारंभ आदेश पालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक विवेक धांडे यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आला आहे कार्यारंभ आदेशापासून ते अठरा महिन्याच्या आत प्रत्यक्षात योजना कार्यान्वित करण्याचे बंधन मुंबई येथील आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट या मक्तेदार कंपनीवर बंधन घालण्यात आले आहे शहरासाठी आता दरडोई दर माणशी दररोज एकशे पस्तीस लिटर शुद्धीकरणासह निर्जंतुक पिण्याचा पाण्याचा पुरवठा होण्याचे शहरवासीयांचे दीर्घकाळापासून बाळगून असलेले स्वप्न साकार होण्याची चिन्हे आता दृष्टीक्षेपात आली आहेत मनमाड पाठोपाठ आमदार सुहासआण्णा कांदे यांनी नांदगाव शहराचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने शहरवासीयांनी स्वागत केले आहे

प्रतिक्रिया …
शहराची पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,अजितदादा पवार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळेच नांदगावकर जनतेला दिलेला शब्द मला प्रत्यक्षात उतरविणे शक्य झाले
:- आमदार सुहासआण्णा कांदे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.