ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुढच्या निवडणूकीत सुहास आण्णा कांदेंना डबल मतधिक्याने निवडून द्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदगावला भव्य शिवसृष्टी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिखामात लोकार्पण

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.३१ माझ्या सोबत आलेल्या सर्वच आमदारांना त्यांच्या मतदार संघातील विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला नाही त्यात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अवघ्या दोन वर्षातच नांदगाव मतदारसंघात पिण्याच्या पाण्यापासून ते शिवसृष्टी निर्मिती सारखे भरीव विकासकामे केल्याने त्यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे थेट मतदाराना आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकलं

मुख्यमंत्र्यांनी कार्यसम्राट आमदार म्हणून सुहास कांदे यांचे कौतुक करतांना येथील पालिकेच्या नव्या इमारती साठी दहा कोटींचा निधी देणार असल्याचे सांगत आपल्यासोबत आमदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आपणही त्यांचा विश्वास सार्थ ठरवीत त्यांना त्यांच्या मतदार संघात विकासासाठी कुठेही कमी पडू दिले नाही विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केला

राजकोट येथील घटना दुर्दैवी असून त्यापेक्षाही या घटनेचे राजकारण हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शिवसृष्टीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.नांदगाव शहरात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पुढाकाराने भव्य शिवसृष्टी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,आमदार किशोर दराडे, आमदार श्री. सुहास आण्णा कांदे, माजी खासदार संजय निरुपम, ज्येष्ट नेते बापूसाहेब कवडे सामाजिक कार्यकर्त्या अंजुमताई कांदे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, छ्त्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. ते राज्याची अस्मिता आहेत. भारताचा अभिमान आहेत. ते राज्याची श्रद्धा आहेत. राजकोट येथील घटना दुर्दैवी असून राज्य शासन आणि नौदलातर्फे लवकरच पुन्हा भव्य पुतळा उभारण्यात येईल. असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नांदगाव शहरात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक प्रकल्प उभारण्यासाठी झालेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शोभेल अशी शिवसृष्टी तयार झाली आहे. ही शिवसृष्टी नांदगाव शहराच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा ठरेल. शिवसृष्टीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याचा महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बहीणींना लाभ झाला आहे. आगामी काळात या योजनेचा निधी वाढविला जाईल. या योजनेच्या माध्यमातून अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. तसेच मुख्यमंत्री स्वयंम योजना सुरू केली. राज्याला विकास कामातून पुढे नेण्यात येत आहे. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ट नेते बापूसाहेब कवडे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आमचे कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे हे सर्व जातीपाती- धर्मा पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे काम करतात. या मतदार संघात १९८० सालापासून अनेक आमदार झाले आणि ते या प्रश्नावर झालेत किंवा मनमाडचा पाणी प्रश्न आम्ही सोडवु आणि त्या प्रश्नावर लोकांनी त्यांना निवडून दिल निवडून आल्यावर त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेले असतील पण हा पाणी प्रश्न सोडविण्याचे काम फक्त तुमच्यामुळे शक्य झाले आहे त्याला कारण की नगरपरिषदेची लोक वर्गणी 75 कोटी रुपये राज्यसरकारने भरले तसेच 330 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना ही केवळ आपल्यामुळे साकार होत आहे काही महिन्यातच मनमाडकरांना नळाद्वारे पाणी मिळेल त्यात कुठली शंका नाहीं .मतदासंघातील विकास कामांसाठी सुहास अण्णांनी जेवढा निधी मागितला तेवढा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे ,मतदरसंघात असे गाव नाही की या ठिकाणी विकास काम पोहोचले नाही .आज काही गावे अशी आहेत की त्यांना विकास कामांना निधी द्यायला आम्ही तयार आहोत पण त्यांना गावात कुठले विकास काम करण्यासाठी गावात जागा शिल्लक राहिलेली नाही असा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास आमच्या मतदारसंघातल्या दमदार आमदार सुहास अण्णा कांदे यांनी घेतला आहे. एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्री असते त्याच प्रमाणे अंजुमताई कांदे या आज आमदार सुहास आण्णा कांदे त्यांच्या मागे नसून त्यांच्या बरोबरीने काम करीत आहे त्यांनी मतदार संघात महिलांचा एक युनिट केला आहे त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी केले आणि त्यांना ती साथ मिळाली की या ठिकाणी लाडक्या बहिणीवर अधिक बळकट्टी मिळाली आहे आमचा मतदार संघ हा कायम दुष्काळी आहे आमच्या मतदारसंघांमध्ये काही गावांना पाऊस समाधानकारक पाऊस नसल्याने या गावांना पिण्याचे पाणी सुद्धा विहिरींमध्ये शिल्लक नाही अशी अवस्था आमची आहे नार पार योजनेत नांदगाव तालुक्याच समावेश करावा अशी मागणी केली तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे हा मतदार संघ भाऊसाहेब हिरे यांचा मतदारसंघ आहे फेर मतदार संघाच्या फेर बदल नंतर हा स्वतंत्र झाला पुढच्या मंत्रिमंडळत दादासाहेब भुसे सोबत आमचे आण्णा दिसावेत अशी मागणी केली.

आमदार सुहास आण्णा. कांदे म्हणाले की, शिवसृष्टीच्या माध्यमातून नांदगावकरांचे स्वप्न साकारले आहे. या शिवसृष्टीत छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याची उंची ७१ फूट आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवसंग्रहालय साकारण्यात येईल. मनमाडला करंजवण पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नांदगाव करिता पाणीपुरवठा योजनाही लवकरच कार्यान्वित होईल, असेही सांगितले नांदगाव मतदारसंघात यापूर्वी सलग १० वर्ष आमदार असल्याकडून फक्त विकासकामांची आश्वासने देण्यात आली. परंतु, कामे झाली नाहीत. माझ्या आणि यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या १० वर्षातील कार्याची तुलना केल्यास माझी कामे जास्त असल्याचे सांगत त्यांनी पंकज भुजबळांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली.

*******
मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदगाव शहरात येतात मनमाड – नांदगाव रस्त्यावर दोन्हीं बाजुला उभे असलेल्या १०० जेसीबीतू फुलांची उधळण मुख्यमंत्र्यावर करण्यात आले, शाही थाटात मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम स्थळी आणले गेले

*****
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य वातावरणात लोकार्पण…
शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकांपर्यंत फटाक्यांची एकच आतषबाजी झाली हा दीपमान सोहळा मतदारसंघातील उपस्थित नागरिकांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवायला फटक्यांची आतषबाजी ग्रामीण भागातील लोकांनीही आपल्या गावातून अनुभवली ..

यानिमित्त गायक, दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, गायिका वैशाली सामंत यांचा स्वर संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास ज्येष्ट नेते बापुसाहेब कवडे, मधुकर हिरे माजी आमदार संजय पवार, राजेन्द्र देशमुख मविप्र संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे, विलास आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश बोरसे,बंडू पाटिल,राजेंद्र पवार,राजेंद्र देशमुख,बाळकाका कलंत्री,जि.प सदस्य रमेश बोरसे,विष्णु निकम,राजु जगताप,संदीप सूर्यवंशी,देवाज ग्रूप चे सुनील जाधव,शिवसेना युवा तालुकाप्रमुख सागर हिरे,सुनिल जाधव,जीवन गरुड,फरान खान, भाजपा चे दत्तराज छाजेड,अल्ताफ खान,महावीर जाधव,विजय इप्पर,आण्णासाहेब पगार,विठलआबा आहेर,निलेश इप्पर,दिलीप इनामदार,समाधान पाटिल,बाळासाहेब आव्हाड,संजय आहेर,बबलु पाटिल,राजेंद्र आहीरे, शिवसेना महिला आघाडीच्या अड विद्या कसबे आदीसह मतदार संघातील महिला,पुरुष,युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.