क्रीडा व मनोरंजन

नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये नॅशनल स्पोर्ट्स डे उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

बाणगाव /नांदगाव ता.02 नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये नॅशनल स्पोर्ट्स डे उत्साहात साजरा करण्यात आला

संपूर्ण देशभरात इंटरनॅशनल स्पोर्ट्स साजरा केला जातो निमित्ताने नमन एज्युकेशन सोसायटीचे संचालक संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल,शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या दिवसाचे आयोजन करण्यात आलेले होते.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते.हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केलीये.त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928,1932 और 1936) नोंदवलीये.यामुळे मेजर ध्यानचंद आणि सरस्वती मातेला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खेळ सादर केले यापैकी काही विद्यार्थ्यांनी पासिंग बॉल,बॉल बॅलन्स,कबड्डी,योगासने, सूर्यनमस्कार,कुस्ती इ खेळांचा समावेश करण्यात आलेला होता.


त्याचबरोबर २४ ऑगस्ट रोजी मनमाड येथील वीर सावरकर प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेला घवघवीत यश मिळालेले होते या मुलांचा व क्रीडा शिक्षिका मयुरी खैरनार यांचा देखील गौरव केला.क्रीडा दिनी शाळेचे संस्थाचालक, शिक्षक विद्यार्थी राष्ट्रीय खेळ दिवसाचा आनंद घेतला

फोटो ओळ

नांदगांव :नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये नॅशनल स्पोर्ट्स डे संगीत संस्थाचालक संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल क्रीडा शिक्षिका मयुरी खैरनार विद्यार्थी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.