महाराष्ट्र

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नांना यश , सरकारने नांदगाव पालिकेच्या इमारतीसाठी दिले दहा कोटी

पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ४० गुंठे जागा उपलब्ध

,गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव, ता. ०३ नांदगाव नग्रापलिका स्थापनेपासून अतिशय मर्यादित अशा पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत असलेल्या पालिका इमारतीच्या विस्तारासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी. आता जुन्या तहसीलची वापराविना पडून असलेली जागा मंजूर केली आहे. त्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अद्ययावत नव्या इमारतीसाठी दहा कोटींचा निधी दिल्याने १०२ वर्षाच्या पालिकेला स्वतःची अशी मोवाळी प्रशस्त जागा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मागील वर्षी प्रस्ताव नगरविकास संचालनालयाकडे सादर केला होता. सिटी सव्र्व्हे नंबर ३५०७/अ मधील तहसील कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतर झाल्यापासून चालवला जात आहे. कालौघात कार्यालय व दालनासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने नवीन इमारतीची आवश्यकता होती.पालिकेची सध्याची इमारत ज्याठिकाणी आहे ते अवघ्या पाच हजार चौरसफूट आहे.त्यात वरच्या मजल्यावर सभागृह असून या सभागृहाला संलग्न केवळ नगराध्यक्षसाठी स्वतंत्र दालन आहे. उपनगराध्यक्षांना नगराध्यक्षांच्या शेजारी स्वतःचे आपले दालन नसल्यामुळे खुर्ची टाकून बसावे लागते. स्थायी समितीसह एकूण सहा विषय समितीच्या सभापतींना एकही दालन नाही. विरोधी गटाचे नेतेपद निर्माण झालेले नाही. अन्यथा आणखी एक दालन वाढवावे लागले असते
वरच्या मजल्यावर नगराध्यक्षांचे दालन असले तरी त्याला अँटीचेंबर नाही. मात्र मुख्याधिकाऱ्यांना खालील मर्यादित जागेत आस्थापनासमोर स्वतंत्र दालन दिलेले आहे. नागरीकरणाच्या संबंधातून विषय घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळाला जर ते पाच किंवा सात जणांचे असेल तर ठीक हेच शिष्टमंडळ मोठ्या संख्येचे असेल मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दाटीवाटी करण्याची वेळ लोकांवर येत असते.
१०२ वर्षांनंतर इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जुनीइमारत निर्लेखित करणे अपेक्षित होते. पालिकेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या इमारतीतून दाटीवाटीने कोंबलेल्या विभागातून प्रशासकीय कामकाजाचा गाडा चालविला जात आहे
.तत्कालीन मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी कार्यालयीन इमारत बाबत आमदार सुहास कांदे लक्ष वेधले होते श्री धांडे यांच्याच कार्यकाळात नव्या इमारतीच्या फायलींचा प्रवास झाला व तो अखेर असा मार्गी लागला पडून असलेल्या एकूण सहा हजार ११७ चौरस मीटर जागेपैकी एकूण चार हजार चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाची जागा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हस्तांतरित करण्यासाठीमान्यता दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.