नांदगावला समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी किट वाटप
नांदगावला बांधकाम कामगार नोंदणीसाठी सेतू केंद्र सुरू
गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगावता. ता ०९– नांदगाव मतदार संघातील बांधकाम कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी लागते.त्यासाठी त्यांची रोजंदारी बुडते.त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगार सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्रे स्थापन करण्यात यावे ही आमदार सुहास आण्णा कांदे यांची मागणी पुर्ण होवुन.शुक्रवारी सेतू केंद्रांचे उद्घाटन समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते नोदनिकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगीड भांडे किट वाटप करण्यात आले.इमारत बांधकाम कामगार यांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे.कोणताही व्यक्ती लहान किंवा मोठा नसतो तर त्याचे योगदान महत्वाचे असते.कष्ट करणारा वर्ग आणि सामाजिक नीतिमूल्ये जपणारा असून या वर्गाचे मोठे काम आहे. सेवा आणि माणुसकी जपत कष्ट घेणाऱ्या हातांची आम्हाला जाणीव आहे असे मनोगत यावेळी सौ.अंजुमताई कांदे यांनी व्यक्त केले.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना नांदगाव येथील विश्रामगृहात गृहपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे.नाशिक व मालेगाव या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी होते.लाभार्थी दिवस – दिवस ठाण मांडून मुक्कामी बसत असत. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. म्हणून कामगार लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून तालुकानिहाय गृहपयोगी भांडी वाटप केंद्र सूरु करावे,अशी मागणी सुहास आण्णा कांदे यांनी कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे,कामगार आयुक्त माळी यांच्याकडे केली होती.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मागणीनंतर कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी विवेक कुंभार,सचिव यांनी बांधकाम कामगार विभागास तालुकानिहाय गृहपयोगी वस्तू म्हणजे भांडी वाटप केंद्र सुरु करण्याच्या तत्काळ सुचना दिल्या.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नांदगाव तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची गैरसोय दूर झाली आहे
नांदगाव सेतू कार्यालयात गेल्या आठवड्यात पासून सुरू असलेल्या नोंदणीत १ हजारच्या च्या वर बांधकाम कामगारांचे नोंदणी झाली असून ८०० कामगारांनी आपले नूतनीकरण केले आहे नवीन नोंदणी झालेल्या प्रत्येक कामगारांना शेप्टी किट व नूतनीकरण झालेल्या कामगार कुटुंबांना गुरुपयोगी साहित्य ( भांडी संच वाटप केले जात आहे, या सेतु नोंदणी केंद्रावर कामगारांची नोंदणी करण्यापासून ते साहित्य वाटप करण्यापर्यंत धनंजय कांदे,शिवसेना यूवा सेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे शहराध्यक्ष सुनील जाधव प्रकाश शिंदे,सेतू केंद्रचालक रवींद्र खैरनार हेमंत शेवाळे हे परिश्रम घेत आहे
@@@@@
इमारत व इतर बांधकाम कामगार तालुका सेतु कार्यालयात विविध योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करत असुन.या ठिकाणीही प्रचंड गर्दी होत असून कामगारांना दिवसभर नोंदणीसाठी उभे रहावे लागते.तरीही अनेक कामगारांची नोंदणी होत नाही पुन्हा त्यांना दुसर्या दिवशी नोंदणीसाठी यावे लागते.भांडी वाटप नोदणी करण्याची साईट दोन – दोन बंद असून भांडी घेण्यासाठी येणारे कामगार नोदणी न होतातच परत खाली हाताने जातात ही हेळसांड थांबविण्यासाठी मंडळनिहाय नोंदणी कार्यालय सुरु करण्याचीही मागणी कामगार करत आहे ..
फोटो ओळ
नांदगाव – येथील शासकीय विश्रामगृह आवारात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप कर करताना समाजसेविका अंजुमताई कांदे,धनंजय आप्पा कांदे, सेतु संचालक रवींद्र खैरनार आदी