महाराष्ट्र

नांदगावला छाजेड पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा पैशांचे पाकीट केलें परत.

गर्जा महाराष्ट्र २४ न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.१७ शहरातील छाजेड पेट्रोलियम पंपावरील कर्मचारी अमोल भाऊसाहेब काकळीज याने ग्राहकाचे पैशांचे पाकीट परत करून प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला.कर्मचाऱ्यामुळे धनराज वडगर यांना पाकीट मिळाले.त्यात रोख रकमेशिवाय महत्वाचा दस्ताऐवज होता.

नांदगाव शहरातील येवलारोड येथील छाजेड पेट्रोलियम येथे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडी (तांडा) येथील मेंढपाळ शेतकरी धनराज कोंडीबा वडगर हे नांदगाव येथे कामानिमित्त आले असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या छाजेड पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरून कामासाठी पुढे निघून गेले त्यावेळी त्यांचे खिशातील पाकीट अनावधानाने पंपावर पडले काही वेळाने छाजेड पंपावरील कर्मचारी अमोल काकळीज याच्या दृष्टीस पडले त्याने तात्काळ ते पाकीट पंपाचे संचालक दत्तराज छाजेड यांच्याकडे आणून दिले.संचालक दत्तराज छाजेड यांनी धनराज वडगर यांच्या पाकीट मधील कागदपत्रांच्या व फोन नंबरच्या आधारे संबंधित व्यक्तीशी संपर्क झाल्यावर रोख रकमेसह महत्त्वाचे कागदपत्र असलेले पाकीट परत करण्यात आले,त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्याने छाजेड पेट्रोलियम येथील प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे आभार मानले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.