ताज्या घडामोडी

कांदा निर्यातबंदी विरोधात नांदगावला येवला – रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ९ कांदा निर्यात बंदी झाल्याचे कळताच येथील बाजार समितीच्या आवारात सकाळी लिलावासाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले तर लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी निर्यातबंदीच्या विरोधात नांदगांव – येवला रस्त्यावर बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे रास्तारोको आंदोलन केले

या रास्तारोको मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रास्तारोको वेळी निलेश चव्हाण,विलास पाटील,संदीप चव्हाण,साईनाथ सोनवणे,ज्ञानेश्वर बिन्नर, सोपान म्हस्के,आसिफ रज्जाक शेख यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या किसान सेलचे अध्यक्ष व शेतकरी नेते निलेश चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले कि फेब्रुवारी मार्च महिन्यात कांदा सानुग्रह अनुदान प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये जाहीर केले होते गेले नऊ महिने झाले शेतकऱ्याच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे उर्वरित रक्कम बाकी आहे शेतकरी आधीच दुष्काळ गारपिटीने त्रस्त झालेला आहे त्यामुळे कांदा अनुदान रक्कम एक रकमे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीच्या निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले

आहे तसेच कांदा निर्यात बंदी लागू करून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्याचे काम केले आहे असा आरोप करीत त्यांनी त्यामुळे सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अशी मागणी केली मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,महसूल अधिकारी योगेश पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.