ताज्या घडामोडी

मंगळणे येथील गायरानसह गावठाणातील अतिक्रमण जमीनदोस्त

नांदगाव,ता ९ तालुक्यातील मंगळणे येथील गायरान क्षेत्र व गावठाण या दोन ठिकाणी अतिक्रमणे शुक्रवारी ता.०८ रोजी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी मौजे मंगळणे ता.नांदगांव जि.नाशिक येथील सरकारी गुरेचरण ग.क्र.१२४ खाते क्र. १२५ क्षेत्र १७ गुंठे या जमिनीवर बेकायदेशिर ताबा घेवून केलेल्या पिक पहाणीची नोंद रह करुन जमिन पुन्हा शासनाच्या ताब्यात घेणेबाबत.संजय बापू पाटील यांनी १५ जून २०१६ ला पाहिलांदा लेखी तक्रार अर्ज केला होता त्यावर जिल्हाधिकारी प्रांताधिकारी अशा पातळीवर सुनावणी होत असा या तक्रारअर्जाचा प्रवास होत तो हा तक्रार अर्ज तत्कालीन तहसीलदार मनोज देशमुख यांच्या कडे निर्णयासाठी दाखल झाला होता.त्यावर १० जून २०१९ ला देशमुख यांनी शासनाच्या महसूल विभागाच्या १० ऑक्टोबर २०१३ च्या परिपत्रकाचा आधार घेत हे अतिक्रमण काढून घेण्याबाबत आदेश काढले होते त्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी तालुका पंचायत समिती प्रशासनाला पाच वर्षाचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागली शेवटी आज प्रलंबित कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पडली दरम्यान सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना झालेली कारवाई करता येते का यावर न्यायालयात दाखल प्रकरण असले तरी मनाई हुकूम नसल्यामुळे प्रलंबित कारवाई करता येऊ शकते अशी माहिती तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे,यांनी दिली शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जेसीबीने या क्षेत्रात असलेले सिमेंट कांक्रीटचे घर व अन्य अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली यावेळी वरिष्ठ सहाय्यक दिनेश पगार ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांच्यासह तलाठी महसुलाचे मंडळ अधिकारी आदी उपस्थितीत होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.